जळगाव ;-तालुक्यातील असोदा येथे जुगार अड्डा सुरु असल्याच्या माहितीवरून तालुका पोलिसांनी धाड टाकली असता जुगाऱ्यांना याची चाहूल लागताच त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र त्यांच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत . या घटनेमुळे जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहे .
यांनी केली कारवाई
तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपनिरीक्षक कदीर तडवी, वासुदेव मराठे, चेतन पाटील, लालसिंग पाटील, सुधाकर शिंदे, विलास शिंदे, शैलेश चव्हाण, पोपट सोनार, साहेबराव पाटील, अरुण पाटील यांच्या पथकाने आसोदा गावात धाव घेत छापा मारला. दरम्यान, पोलिसांचे पथक आल्याचे पाहताच जुगारींनी हातातील जुगाराचे साहित्य, पैसे, दुचाकी जागेवरच सोडुन पळ काढला. परंतू, त्यांच्या १७ दुचाकी जप्त केल्या. या सर्व दुचाकी एका ट्रकमधून तालुका पोलिस ठाण्यात आणल्या आहेत.