• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

असहयोग आंदोलनाने सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागविली : अनिल नौरिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 27, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भारत, विश्व
0
असहयोग आंदोलनाने सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागविली : अनिल नौरिया

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमाला

जळगाव (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींनी असहयोग आंदोलन आणि सविनय कायदेभंगाद्वारे सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत केली. त्यामुळेच ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचा मोठा लढा उभारला गेला, असे विचार अनिल नौरिया यांनी व्यक्त केले. येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व सुप्रसिद्ध इतिहासकार अनिल नौरिया यांचे “असहयोग आंदोलन – स्वतंत्रता संग्राम की अनोखी मशाल” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वक्ते अनिल नौरिया, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या प्रशासकीय विभागाच्या प्रमुख अंबिका जैन, प्राचार्या डॉ. गौरी राणे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी डॉ. अश्विन झाला उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच नौरिया यांनी असहयोग आंदोलन व सविनय कायदेभंग यातील फरक समजावून सांगितला. आपल्या न्याय व हक्काची मागणी अहिंसेच्या मार्गानेच केली पाहिजे याचा गांधीजींचा अट्टाहास असायचा. यासाठी महात्मा गांधीजी आंदोलन करण्यासाठी पूर्व तयारी करून घेत असत. कुणाला काय जबाबदारी द्यायची हे ठरलेले असे. अगदी जिल्ह्याची, व्यक्तीची निवड करतांना विशिष्ट निकषांवर केली जात असे. यात अहिंसा, स्वदेशीचा वापर, बलिदान देण्याची तयारी, हिंदु मुस्लिम एकता, सामाजिक सौहार्दता याचा समावेश असे. स्पृश्य, अस्पृश्य हा भेद नसावा इत्यादीबाबत महात्मा गांधी सजगतेने त्याची चाचणी स्वतः घेत असत असेही त्यांनी सांगितले. याच आधारावर गुजरातमधील बारडोली, खेडा आणि आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर या जिल्ह्यांचा विचार करण्यात आला होता. १९१९ च्या असहकार आंदोलनानंतरच सर्व भारतीय खुलेपणाने स्वातंत्र्याची मागणी करू लागले. याच काळात कला, साहित्याची देखील भरपूर निर्मिती झाली. याबाबतचे उदाहरणे सांगत त्यांनी महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनाचे एक एक पदर उलगडून सांगितले.

आरंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘गांधी होंगे कही भारत में’ गाण्याची ध्वनिफीत वाजविली गेली. यावेळी डॉ. अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या गौरी राणे यांनी देखील संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. झाला यांनी केले. १९२४ पर्यंत हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने असहयोग आंदोलन या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी झालेल्या तीन व्याख्यान व वक्ते याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले तर आभार चंद्रशेखर पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास बेंडाळे महाविद्यालयाचे उप-प्राचार्य विजय पाटील, प्राध्यापक, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन व सहकारी यांची उपस्थिती होती.

Caption – न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमाला मध्ये आपले विचार व्यक्त करताना अनिल नौरिया शेजारी व्यासपीठावर अंबिका जैन, प्राचार्या डॉ. गौरी राणे, डॉ. अश्विन झाला.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/ashyog-andolanane-satatrya/असहयोग आंदोलनाने सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागविली : अनिल नौरिया
Previous Post

शेत-शिवारात रानडुकराने मक्याची केली नासधूस

Next Post

कलावंत परिचय – १ (प्रथम दिन प्रथम सत्र)

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कलावंत परिचय – १ (प्रथम दिन प्रथम सत्र)

कलावंत परिचय - १ (प्रथम दिन प्रथम सत्र)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
1xbet russia

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026
धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !
1xbet russia

धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !

April 13, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon