जळगाव ( प्रतिनिधी) ;-येथील अरूश्री हॉस्पिटल येथे १२ मे जागतिक परिचारिका दिननिमित्ताने परिचारिका, डॉक्टर
व संपूर्ण कर्मचारी यांना घड्याळ वाटप करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या. १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हुणुन पाळला जातो. अमळनेर येथील सौ ज्योतिर्मयी व त्यांचे पती दिलीपराव सोनवणे हे मागील काही दिवसात कोरोनाने जळगाव येथील अरुश्री हॉस्पिटल येथे उपचारसाठी दाखल होते . त्यांना उत्तम प्रकारे उपचार मिळाल्याने ते लवकर पूर्णतः बरे होऊन घरी गेल्या व त्यांनी परिचारिका दिनाचे औचित्य साधून आपले वडील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्रीराम बावीस्कर यांच्या हस्ते हॉस्पिटल मधील परिचारिका, डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांना भेट म्हणुन घड्याळ देऊन कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. परीक्षित श्रीराम बावीस्कर , डॉ. स्वाती बावीस्कर , श्रीराम बावीस्कर , विशाल शिंदे , डॉ. योगिता शिंदे, योगेश बावीस्कर, शैलेंद्र सोनवणे, विजय शिंदे, राकेश मोरे, लवकुमार पाटील , शितल बडगुजर, समाधान शिंदे आदी उपस्थित होते.