जळगाव (प्रतिनिधी) : राज्य सरकारचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात महिलांसाठी भरपूर तरतुदी सादर करण्यात आल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती डॉ. केतकी पाटील महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांनी युवतींशी संवाद साधून दिली.
यावेळी मंचावर डॉ.प्रशांत वारके, डॉ. केतकी पाटील भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा महिला मोर्चा जळगाव जिल्हा पूर्व, पश्चिम आणि महानगर समन्वयिका उपस्थित होत्या. डॉ. केतकी पाटील यांनी मार्गदर्शन करताना अर्थसंकल्पातील तरतुदी, महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. सरकारने महिलांसाठी आणलेल्या योजनांचा लाभ घ्यावा. आपल्या आसपासच्या गरजू महिलांना या योजनांची माहिती द्यावी जेणेकरून या योजनांचा उपयोग त्यांना त्यांच्या विकासासाठी करता येईल. शासनाने महिलांच्या विकासासाठी सकारात्मक विचार केलेला आहे याचा पुरेपूर लाभ घेऊन आपला व आपल्या माध्यमातून समाजाचा विकास करावा असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आणि आभार प्रा. प्राजक्ता पाटील यांनी केले.