• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

हिमाचलमधील खून करून मुंबईकडे पळाले; मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हिमाचलमधील खून करून मुंबईकडे पळाले; मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

हिमाचल खून प्रकरणातील चार आरोपी जळगाव पोलिसांच्या ताब्यात; शनिपेठ पोलिसांची तत्पर कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) -: हिमाचल प्रदेशातील खून प्रकरणातील चार आरोपी मुंबईच्या दिशेने पळून जात असताना जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत ताब्यात घेण्यात आले. हिमाचल प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतले.

हिमाचल प्रदेशात मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी एफआयआर क्रमांक ८२/२०२६, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मयत मुकेश कुमार आणि आरोपी एकत्र दारू पीत असताना त्यांच्यात वाद झाला. यावेळी मयताने आरोपींना बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप असून, त्यानंतर संतापाच्या भरात आरोपींनी मुकेश कुमार यांचा खून केल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांकडून देण्यात आली.

खून केल्यानंतर आरोपी किसंपूर येथून सकाळी सुमारे ११ वाजता निघाले. त्यानंतर ते अंबाला येथे पोहोचले आणि दुपारी सुमारे ४.३० वाजता मुंबई एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. प्रवासादरम्यान पैसे संपल्याने तसेच भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी ते जळगाव येथे उतरल्याची माहिती तपासात समोर आली.

दरम्यान, हिमाचल प्रदेश पोलिसांकडून या चारही आरोपींचा शोध सुरू होता. आरोपींचे लोकेशन जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत असल्याची माहिती हिमाचल पोलिसांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना दिली.
माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. पोहेकॉ विजय खैरे, पोहेकॉ योगेश जाधव, पोहेकॉ अनिल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि रवींद्र साबळे यांच्या पथकाने आरोपींचा माग काढत अत्यंत शिताफीने व समन्वयाने कारवाई केली. अखेर चारही आरोपींना शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये चंदन कुमार (रा. कुतुबपूर, पोलीस ठाणे सकरा, जिल्हा मुझफ्फरपूर, बिहार), रोशन गोगल मुखिया (रा. कुतुबपूर, पोलीस ठाणे सकरा, जिल्हा मुझफ्फरपूर, बिहार), संतोष कुमार (रा. बरियारपूर, जिल्हा मुझफ्फरपूर, बिहार) आणि अजित कुमार जोगा मेहतो (रा. पंडरक, जिल्हा पाटणा, बिहार) यांचा समावेश आहे.

दरम्यान, आरोपींचा ताबा घेण्यासाठी हिमाचल प्रदेशातील संबंधित पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी जळगावकडे रवाना झाले आहेत. पुढील कायदेशीर कारवाई हिमाचल प्रदेश पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

Previous Post

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिमाचलमधील खून करून मुंबईकडे पळाले; मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले
क्राईम

हिमाचलमधील खून करून मुंबईकडे पळाले; मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

October 1, 2026
खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
क्राईम

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

September 30, 2026
२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित
क्राईम

२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित

September 30, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

September 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हिमाचलमधील खून करून मुंबईकडे पळाले; मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

हिमाचलमधील खून करून मुंबईकडे पळाले; मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

October 1, 2026
खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

September 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!