जळगाव तालुक्यातील विदगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील विदगाव येथील अ.म. वारके विद्यालयाच्या वर्ग खोलीतून १० हजार रूपये किंमतीचे एलईडी टीव्ही आणि डीव्हीडी प्लेअर अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना उघड झाली आहे. घटना सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदगाव येथील अ.म. वारके विद्यालय शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० ते २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान बंद होती. त्या वेळी अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या वर्ग खोलीतून एलईडी टीव्ही आणि डीव्हीडी प्लेयर असा एकूण १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्याध्यापक राजेंद्र न्याहळदे यांनी मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहेत.