• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अप्पाला पटवले, जळगावातून निघाला, पुढे अपघात केला अन् अलगद सापडला…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2023
in Uncategorized
0

बांभोरी खुनाच्या संशयित आरोपीचे कारनामे उघड, जळगाव एलसीबीची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) – बांभोरी येथील आशिष शिरसाळे खून प्रकरणी एलसीबीने दोन संशयित आरोपीना ताब्यात घेतले. यातील मंडळ अधिकारी असणाऱ्या आप्पांना संशयित मारेकरी प्रमोद उर्फ छोटूने सुरुवातीला खुनाबद्दल काहीच न सांगता सोबत घेऊन जाण्यास पटविले. जळगावातून निघून ते मराठवाड्यात सुद्धा पोचले. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांच्या वाहनाने एका दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर ते अडकले. तेथेच दोघांचा पळापळीचा खेळ थांबला आणि लोकेशन ट्रेस करीत मागावर असलेल्या जळगाव एलसीबीने स्थानिक नळदुर्ग पोलिसांच्या मदतीने दोघांना शिताफीने पकडले.

आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (वय २२, रा. शनिपेठ, बांभोरी ता. धरणगाव) या तरुणाच्या खूनप्रकरणी एलसीबीने रविवारी संशयित छोटू उर्फ प्रमोद भीमराव नन्नवरे (वय ४०, रा. बांभोरी ता. धरणगाव) व त्याचे सोबत असणारे मंडळ अधिकारी (आप्पा) अमोल विक्रम पाटील (वय ३४, रा. कल्याणी नगर, दादावाडी परिसर, जळगाव) यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. खून प्रमोद उर्फ छोटूने केल्यावर तो पाळधी येथील हॉटेलवर गेला. तेथे मागील बाजूस त्याने कपडे बदलविले. नंतर तो दारू पिण्यासाठी बसला. तेथे त्याच्या ओळखीचे मंडळ अधिकारी (आप्पा) अमोल विक्रम पाटील हे हॉटेलमधून निघत असताना त्यांच्यात संवाद झाला. मला दोन दिवसांची सुटी असल्याने देवदर्शनाला जात आहे, असे आप्पाने सांगितल्यावर छोटूने मलाही ड्रायव्हर म्हणून घेऊन चला असे सांगितले. त्यानंतर आप्पा अमोल पाटील यांनी त्यालाही घेऊन त्यांची कार क्र. (एमएच ०२ सीझेड ७९५३) ने मराठवाड्याच्या दिशेने निघाले.

छ. संभाजीनगर, बीड ओलांडून दोघे उस्मानाबाद जिल्ह्यात पोचले. तुळजापूर तालुक्यात जळकोट गावाजवळ आले असता दुपारी ३ वाजेच्या सुमारास तेथे एका दुचाकीचालकाला कारने जबर धडक दिली. त्यात दुचाकी क्र. (एमएच ०२ एडी १५२०) वरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातामुळे घाबरल्याने संशयित प्रमोद उर्फ छोटू हा तेथून जवळच्या नळदुर्ग बसस्टँड येथे पोचला. तर अमोल पाटील कार मध्येच राहिले. दरम्यान, संशयितांच्या मागावर लोकेशन ट्रेस करीत येत असलेल्या जळगाव एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने नळदुर्ग बस स्टॅन्ड गाठले. तेथे बस शोधत असताना छोटू उर्फ प्रमोद याला स्थानिक पोलीस स्टेशनचे पीएसआय शहा यांचे मदतीने एलसीबीने ताब्यात घेतले. तर अमोल पाटील यालाही सोबत घेतले.

तेथून दोघाही संशयितांना पोलिसांनी रविवारी संध्याकाळी जळगावात आणले. त्यांना पुढील तपासासाठी धरणगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. तपासासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पो. अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी किसन नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश सोमवंशी, अशोक पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

व्यसन न करण्याची विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी घेतली प्रतिज्ञा

Next Post

“शासन आपल्या दारी” राहिले बाजूला, अन् मंत्री बरसले उद्धव ठाकरे, नाथाभाऊंवर !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

"शासन आपल्या दारी" राहिले बाजूला, अन् मंत्री बरसले उद्धव ठाकरे, नाथाभाऊंवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon