धुळे महामार्गावरील भीषण घटना
जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून घरी येत असताना अज्ञात कारने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान, कारचालक कार सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे.
गणेश सुखदेव महाजन (वय ३०, रा. द्वारका नगर, जळगाव) असे मयत या तरुणाचे नाव आहे. गणेश महाजन हे पाळधी येथे रात्री जेवणासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना त्यांना अज्ञात कारने धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या गणेशला नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयात आणले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यामुळे द्वारका नगर येथे शोककळा पसरली आहे. गणेश महाजन याला धडक दिलेली कार वरील चालक घटनास्थळावरून सोडून पसार झाला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
धडक दिलेल्या कारला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे नेली आहे. दरम्यान गणेश महाजन यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.