जळगावच्या आकाशवाणी चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आकाशवाणी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दि. २५ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
शेख रऊफ शेख अब्दुल्ला बेलदार (वय ६९, रा. अक्सा नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुलं असा परिवार आहे. ठेकेदारी करून ते उदरनिर्वाह करीत होते. शेख रऊफ हे महाबळकडून दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडी २७५१) ने जात होते. (केसीएन)गजबजलेल्या आकाशवाणी चौकात आल्यावर त्यांना पाळधीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी ७६४२) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २५ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे.
नागरीकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. यावेळी जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, आकाशवाणी चौकात प्रचंड खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची जीव धोक्यात आलेला आहे.