यावल तालुक्यात घडला होता अपघात
रावेर ( प्रतिनिधी ) – खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयासमोरील कलानगर परिसरातील रहिवासी कुशल सुरेश इंगळे (वय १९) यांचे बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता उपचारादरम्यान निधन झाले. दि. १८ फेब्रुवारी रोजी किनगावजवळ झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि. १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता खिरोदा येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त शिक्षक सुरेश गंगाधर इंगळे यांचे सुपुत्र तर वैभव सुरेश इंगळे यांचे भाऊ होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









