पाच जण जागीच ठार तर सहा जखमी ; नशिराबाद जवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातून तसेच नशिराबाद इथून बोलेरो वाहनामध्ये बकऱ्या भरून त्या फैजपूर येथील बाजारात घेऊन जात असताना नशिराबाद पुढे असणाऱ्या पुलावर एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येऊन बोलेरो वाहनाला जबर धडक दिली. या धडकेत पाच जण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मयत व्यक्तींचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्याचे काम सुरू असून जखमींवर डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय मध्ये उपचार सुरू आहे.
यावल तालुक्यातील फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप वाहन (एमएच ४३ ए डी १०५१) हे जळगावातून बकर्या घेऊन जात होते. नशिराबाद पुढील मुलाजवळ भरधाव वेगाने रॉंग साईडने येणार्या ट्रकने (एमपी ०९ एचजी ९५२१) बोलेरो वाहनाला जबर धडक दिली.
या अपघातामध्ये जुनेद सलीम खाटीक, फारुख खाटीक, नैन अब्दुल रहीम, अकील शेख गुलाम अन्य एक असे हे पाच जण जागीच ठार झाले आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले घटनेची नोंद करण्याचे काम नशिराबाद पोलिस स्टेशनला सुरू होते.
या अपघातात ट्रकचालक वसंत रामहरी देऊळकर (रा. अकोला, वय ५५), पिकअप व्हॅन चालक रसूल कुरेशी (रा. भडगाव), दुसरा पिकअप व्हॅन चालक प्रकाश पंढरीनाथ शिंदे (रा. पळासखेडा मीराचे, वय ४३), संतोष दौलात धनगर (रा. नेरी, वय ६०), सलीम गुलाब खाटीक (रा. नशिराबाद, वय ५०), मुश्ताक हाजी बिस्मील्ला (लोहारा ता. पाचोरा, वय ४७), अब्दुल रज्जाक खाटीक (नशिराबाद, वय ४६), हनिफ खाटीक (वय ४०), लियाकत बाबु खाटीक ( वय ४८), शे. सलीम शे. मेहबुब खाटीक (रा. भडगाव, वय ४६), शाकीर खाटीक, इरफान खाटीक, जुबेर खाटीक हे जखमी झाले आहेत.