चाळीसगाव तालुक्यातील घटना : सात जणांवर उपचार सुरू
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला आहे. धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तवेरा गाडी दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रमाणे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सोलापूर येथील अक्कलकोट येथून दर्शन घेऊन येणाऱ्या तवेरा या चारचाकी वाहनाचा (एम एच् ४१ व्ही ४८१६) रविवारी रात्री अपघात झाला. हे सर्व जण मालेगावकडे प्रवास करत होते. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहे. या जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. सर्व मालेगाव तालुक्यातील जानेवाडी येथील राहणारे आहेत
अपघातातील जखमी
अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी ,वय 20
जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी, वय 17
सिधेस पुरुषोत्तम पवार,वय 12
कृष्णा वासुदेव शिर्के, वय -4
रूपाली गणेश देशमुख,वय 30
पुष्पा पुरूषोत्तम पवार,वय -35
वाहन चालक – अभय पोपटराव जैन, वय 50
पती-पत्नी मयत तर आठ वर्षांची चिमुकलीदेखील ठार
प्रकाश गुलाबराव शिर्के,वय -65
शिलाबाई प्रकाश शिर्के,वय -60
वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी,वय -35
पूर्वा गणेश देशमुख, वय -08