दोघांची प्रकृती गंभीर
जळगाव (प्रतिनिधी) : जळगावहून शिरसोली येथे घरी जात असलेल्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला एका भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅली जवळ झाला असून दोघांचे प्रकृती अतिशय गंभीर आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती घेत आहेत.
रोहित ताडे, किशोर काटोले, पियुष ताडे (सर्व रा. ताडेवाडा, शिरसोली प्र.बो.ता. जळगाव) हे तिघे विद्यार्थी जळगाव वरून शिरसोली येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास दुचाकी (एम एच १९ सीएस ९१३७) ने घरी परतत होते. त्यावेळी जैन व्हॅलीजवळ येणाऱ्या भरधाव कारने (एम एच सियू ८०९३) मागच्या बाजूने दोघांना जबर धडक दिली.
या धडकेत तिघे जखमी झाले. त्यांना आजूबाजूच्या नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघातामध्ये रोहित ताडे व किशोर काटोले या दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तर पियुष ताडे याची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय अधिकारी प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला घडण्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती जाणून घेतली आहे. घटनेची माहिती शिरसोली गावात होताच कुटुंबीय व नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. अपघातात मोठे दुचाकीचे नुकसान झाले असून कारचे देखील नुकसान झाले आहे.