जळगाव तालुक्यातील जळके येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील जळके गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धड़क होवून झालेल्या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमीना तात्काळ खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जळके गावाजवळ दोन दुचाकिंचा अपघात झाला. दोन्ही दुचाकीवरील चारही जण रस्त्यावर फेकले जावून गंभीर जखमी झाले. या रस्त्यावरून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर त्यांच्या काही सहकार्यासह जात होते. त्यांना रस्त्यावर जखमी अवस्थेत लोक दिसून आल्यनंतर त्यांचासह कृऊबा संचालक डॉ. अरुण पाटील, प्रवीण पाटील, रामेश पाटील, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, एकनाथ पाटील, समाधान पाटील यानी मदतकार्य सुरु करून जखमीना देवकर रुग्णालयात वाहनातून हलविले. नंतर डॉ. नितिन पाटील यांचाशी समन्वय साधुन डॉ. हिमांशु पटेल आणि डॉ. श्रीकांत पूरी यानी तात्काळ उपचार करण्यास सुरुवात केली.
प्रकृति स्थिर असल्याचे डॉक्टरकडून सांगण्यात आले. सुनील सत्तरसिंग बारेला, श्रीराम बारेला (रा. वैजापुर ), बाळू पाटील (जळके) असे जखमीचे नाव असून चौथ्या जखमीचे नाव समजू शकले नाही.