एरंडोल ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एरंडोल पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले. अन्य ३ जण जखमी झाले आहेत .
या अपघातात कारचालक देवराज संजय धनगर (रा.बिलवाडी, ता.जळगाव) व धनराज सोपान बाविस्कर (40, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भरधाव ट्रक आणि इको कार एकमेकावर धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात तीन जण जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
11 जानेवारीरोजी रात्री जळगावकडून धुळ्याकडे निघालेला दुधाचा टँकर (क्र.एम.एच.43 वाय.0238) व समोरून आलेली इको कार (क्र.एम.एच.19 व्ही.9257) मध्ये धडक झाली. या अपघातात कारचालक देवराज धनगर (, रा.बिलवाडी, ता.जळगाव) व धनराज बाविस्कर (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा मृत्यू झाला ज्योती रवींद्र शिंदे (37), ललित रवींद्र शिंदे (29, दोन्ही रा.एरंडोल), जयश्री धनराज बाविस्कर, भारती किरण जाधव, आशुतोष बाविस्कर, सुमन मोतीलाल शिंदे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला.