जळगाव रेल्वे फलाटावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे स्टेशनच्या फलाट क्र. २ वर नवजीवन एक्स्प्रेसमधून पडल्याने एका प्रौढाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस दूरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेख मेहमूद शेख समद (वय ५४, रा. मण्यार वाडा, कोळी पेठ, जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. ते कोळी पेठेत आई, वडील, पत्नी, २ मुले, १ मुलगा यांच्यासह राहत होते. भंगार विक्री करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. (केसीएन)दरम्यान, शेख मेहमूद हे दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता जळगाव फलाट क्रमांक २ वर अप नवजीवन एक्स्प्रेसमधून पडून गंभीर जखमी झाले.
त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. प्रकरणी रेल्वे पोलीस दूरक्षेत्रच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी माहिती घेऊन पंचनामा केला. त्यानंतर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.