जळगाव तालुक्यात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली रस्त्यावरील एका विद्यालयाजवळ भरधाव कार झाडावर आदळल्याने एका तरुणाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. यातील एका जखमीचा बुधवारी दि. १७ जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
तालुक्यातील शिरसोली रस्त्यावर जेवण करून परतत असताना एक कार भरधावपणे झाडावर आदळली होती. या घटनेत आनंदा सोनवणे हा तरुण मृत्युमुखी पडला होता. तर भैरव राणे, योगेश रेंभोटकर आणि प्रवीण आढाव हे गंभीर जखमी झाले होते. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते.(केसीएन)दरम्यान योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय ५५, रा. निवृत्ती नगर, जळगाव) यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी दि. १७ जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाला आहे.
योगेश रेंभोटकर हे दैनिक देशदूत येथे जाहिरात विभागात कामाला होते. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. त्यांच्या जाण्यामुळे रेंभोटकर परिवारावर शोककळा पसरली आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.