जळगावातील एमआयडीसीच्या के सेक्टर मधील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) – भरधाव वेगाने जाणाऱ्या लहान मालवाहू वाहनांची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास के सेक्टर मध्ये घडली . जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दिपक शरद खडके (वय-४१) रा. जुने जळगाव असे जखमी युवकाचे नाव आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , दिपक खडके हे त्यांची दुचाकी (एमएच १९ एजी ५९३४) ने दुपारी १ वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील ‘के’ सेक्टरमध्ये काम करून घरी जात असताना असतांना रेमंड चौफुलीजवळ मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय २०९७) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दिपक खडके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपस करीत आहे.