भुसावळ (प्रतिनिधी ) – सकाळी रस्त्याने मंदिरात जाण्यासाठी पायी चालणाऱ्या महिलेस एका भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीनाबाई मोहन अग्रवाल (वय५५) असे मयत महिलेचे नाव आहे.
महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाजवळच्या रस्त्यावरून जात असलेल्या मीनाबाई मोहन अग्रवाल (वय५५) या महिलेला या मार्गावरून जाणार्या ट्रकने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मयत महिला ही तु.स. झोपे शाळेजवळ, मेथाजी मळा येथील रहिवासी असून त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत पोलिसांत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते .