• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ; एक जण जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2021
in Uncategorized
0

पहूर , ता जामनेर ;- पहूर चिलगाव रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने मोटरसायकला दिलेल्या धडकेत १ जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची दुर्घटना आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सांगवी गावाजवळील पूलानजीक घडली . या अपघातात एका बकरीचाही मृत्यू झाला असून दोन बकऱ्या जखमी झाले आहेत .


पहूर येथून दोन किमी अंतरावर असलेल्या सांगवी गावाजवळ उभारण्यात आलेल्या चुकीच्या पुलामुळे समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने ( एम एच १९ /३१५३ ) पहूर कडून चिलगावकडे जाणाऱ्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली .यात मोटर सायकलस्वार निवृत्ती उखर्डू सुतार ( वय ५० ) रा. चिलगांव यांचा जागीच मृत्यू झाला .
मयत निवृत्ती सुतार हे कापुसवाडी (ता. जामनेर ) येथून त्यांच्या बहिणीला भेटून आपल्या मोठ्या भावासह मोटरसायकलने ( क्र . एम . एच .१९ बी. के . ४८८७ ) चिलगांवकडे जात असताना समोरून पहूरकडे भरधाव वेगात येणाऱ्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर त्याचे मोठे भाऊ वामन उखर्डू सुतार (वय ५५ ) रा. चिलगांव यांच्यासह रस्त्याच्या कडेला बकऱ्या चारणाऱ्या जामराबाई बाबु तडवी , रा सांगवी या जखमी झाल्या असून त्या चारत असणाऱ्या बकरं पैकी एक बकरी जागीच ठार झाली तर दोन बकऱ्या जखमी झाल्या आहेत . जखमींना तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल आले . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले . घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक घटनास्थळी दाखल झाले . या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत . मयत निवृत्ती उखर्डू सुतार यांच्या पश्चात दोन मुले पत्नी असा परिवार असून त्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला .
दरम्यान पहूर – चिलगांव मार्गावर सांगवी जवळ नाल्यावर बांधण्यात आलेल्या चुकीच्या पुलांमुळे सदर दुर्घटना घडली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पुलाची उभारणी करून शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता स्वतःच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने पुल उभारला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे .या पुलामुळे दोन वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते .


 

 

Previous Post

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी “त्रिसूत्री” कायम ठेवा – डॉ. जयप्रकाश रामानंद

Next Post

जिल्ह्यात ४७ कोरोना रूग्ण आढळले; १४१ जणांची मात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात ४७ कोरोना रूग्ण आढळले; १४१ जणांची मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे
1xbet russia

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

February 9, 2026
धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद
1xbet russia

धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद

February 9, 2026
औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ
1xbet russia

औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ

February 9, 2026
मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या
1xbet russia

मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या

February 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

February 9, 2026
धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद

धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon