“गुरू प्रति कृतज्ञता” या भावनिक नाटकाने वेधले लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) :- अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन केलेल्या गुरुपूजनाने झाली. यात विद्यार्थ्यांनी “गुरू प्रति कृतज्ञता” या भावनिक नाटकाद्वारे गुरूंच्या महत्त्वाचे चित्ताकर्षक सादरीकरण केले. गुरुवंदनेवर आधारित नृत्य सादरीकरणाने वातावरण अधिक पावन आणि भावविवश करून टाकले. दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक नृत्यप्रस्तुतींनी उपस्थित सर्वांची मने जिंकली.
या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मनोज परमार यांनी आपले प्रेरणादायी भाषण दिले. त्यांनी गुरूंच्या जीवनातील भूमिकेबद्दल सांगताना विद्यार्थ्यांना शिस्त आणि संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका कीर्ती पगारिया, हिमानी बारी, सोनिया शर्मा, वर्षा मोहिते आणि स्वप्ना मोरे यांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली व प्रशिक्षण दिले. त्यांच्या परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांकडून चांगला कार्यक्रम सादर झाला हे स्पष्टपणे जाणवले.