अनुभूती स्कूल च्या ‘एड्युफेअर-२०२५’ ची सुरवात
जळगाव ( प्रतिनिधी ) –विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून निर्माण केलेली शैक्षणिक जत्रा म्हणजे एड्युफेअर या उपक्रमातून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. यातून मुलांचे भविष्य घडविले जाणार असून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायीक दृष्टीकोन दिसतो, असे कोगटा इंपोर्ट एक्सोपर्टचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी सांगत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणारे अनुभूती स्कूलचे शिक्षक, प्रशासकीय यंत्रणेचेही त्यांनी कौतूक केले.
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्याला आणि नवकल्पनांना व्यासपीठ देणारा ‘एड्युफेअर–२०२५’ हा भव्य शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रमाचे आज प्रेम कोगटा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, क्रेडाई संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष तथा बांधकाम क्षेत्रातील नामांकित उद्योजक अनिश शहा, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी, अंबिका जैन, जैन इरिगेशनचे मिडीया व्हाईस प्रेसिंडेट अनिल जोशी, अनुभूती स्कूलच्या रूपाली वाघ, मनोज दाडकर, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे व सहकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी आकाशात फुगे उडवून वैशिष्ट्यपूर्ण उद्घाटन केले. आज दि. १९ ते २१ डिसेंबर पर्यंत खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर होणाऱ्या एड्युफेअर बघितल्यानंतर अनिश शहा म्हणाले की, देशाचे भविष्य हे विद्यार्थ्यांमध्ये आहे. सायन्स, इंजिनिअरिंग, गणित असो की इतिहासातील रोमन संस्कृतीचे धडे असो हे खेळता खेळता विद्यार्थ्यांना समजत आहे. यातून भविष्यातील चांगल्या नागरीकांची पिढी घडेल असा नोबेल उपक्रम अशोक जैन यांच्या पालकत्वातून राबिला जात आहे हे जळगावकरांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे ते म्हणाले. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकता याव्या, पालकांनीसुद्धा काय केले पाहिजे यासाठी विविध मनोरंजनात्मक खेळ जे शून्य ते ९९ वर्ष वयोगटातील सर्व खेळू शकतात कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी एड्युफेअर मध्ये येऊन मुलांच्या उत्साहाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही निशा जैन यांनी केले.
एड्युफेअर मध्ये ८० च्यावर गेम..
रोज सायंकाळी ४ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत एड्युफेअर सर्व नागरिकांसाठी खुला असेल. यात ८० पेक्षा अधिक गेम झोन आणि विविध आकर्षक प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य दाखवित आहेत. एड्युफेअरमध्ये विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांना चालना देणारे इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमधील विविध खेळ आहेत. विज्ञान आणि गणित विषयांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी, यासाठी बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि सर्जनशीलतेला चालना देणारी मॉडेल्स व प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केलेत. मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेतून विज्ञान, गणित, समाजशास्त्र, संगीत, हस्तकला, नृत्यकला यांचा सुरेख मिलाफ एड्युफेअरमध्ये दिसत आहे. यामध्ये पपेट शो, नृत्य, संगीत सादरीकरणे हीदेखील प्रमुख आकर्षणे असणार आहेत.
खवय्यांसाठी खास ‘खाऊ गल्ली’.. रोमन संस्कृतीचे दर्शन..
एड्युफेअरमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनी उभारलेली खास ‘खाऊ गल्ली’ मध्ये जळगावकरांनी गर्दी केली होती. जादूचे प्रयोग, खाऊ गल्ली, लँग्वेज झोन, ८० पेक्षा अधिक अद्वितीय खेळ, रणपा बैलगाडी सवारी, घमाल पपेट शो, संगीत-नृत्य सादरीकरणे, सायन्स झोन, रोमन संस्कृतीचे दर्शन, ६०० पेक्षा अधिक हस्तकला वस्तू, मॅथ झोन, आरश्यांची दुनिया, अॅडव्हेंचर झोन, टॅलेंट शोसह विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रम एड्युफेअरचे वैशिष्ट्य ठरत आहे.
फोटो कॅप्शन – अनुभूती स्कूलच्या एड्युफेअर -२०२५ चे आकाशात फुगे सोडून उद्घाटन करताना डावीकडून रूपाली वाघ, रश्मी लाहोटी, निशा जैन, प्रेम कोगटा, अशोक जैन, अनिश शहा, मनोज दाडकर
अनुभूती स्कूलच्या एड्युफेअर मध्ये रोमन संस्कृती समजून घेताना प्रेम कोगटा, अशोक जैन, अनिश शहा, निशा जैन, रश्मी लाहोटी









