विनोद तराळ यांचा खळबळजनक आरोप
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग रावेर ऐवजी अंतुर्ली परिसरातून नेण्यासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीच दोन वर्षांपूर्वी संमतीपत्र दिले होते असा खळबळजनक आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद तराळ यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.
श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ कुऱ्हा काकोडा येथे प्रचार रॅलीचे करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सभेत विद्यमान लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केल्याचा आरोप करण्यात आला . केळी विम्याचा प्रश्न त्यांना सोडविता आला असल्याने हजारो शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित आहे. तसेच अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग रावेर शहरातून जातो. मात्र नव्याने प्रस्तावित असलेला तळोदा बऱ्हाणपूर हा महामार्ग पूर्वीच्या महामार्गाने रावेर शहरातून न नेता अंतुर्ली शिवारातून नेण्यात येत आहे. अंतुर्ली परिसरातून नेण्याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
त्यावेळी रक्षा खडसे यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र या महामार्गाच्या प्रस्तावित मान्यतेसाठी दोन वर्षांपूर्वी विद्यमान लोकप्रतिनिधींनी संमती पत्र दिले होते असा खळबळजनक आरोप विनोद तराळ यांनी केला आहे. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, उमेदवार श्रीराम पाटील, डॉ जगदीश पाटील, दशरथ कांडेलकर , एजाज मलिक, दिनेश पाटील, यु डी पाटील, रवींद्र दांडगे, संजय पाटील, डॉ बी सी महाजन, माणिकराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.