जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्नांची संख्या वाढत असल्याने आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मनपा आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे स्वातंत्र्य चौकात रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अडवून अँटीजेन तपासणी करण्यात आली.


सव्वा सहा वाजेपर्यंत सुमारे ५० च्यवर नागरिकांची तपासणी करण्यात आली . या तपासणीमध्ये मनपाचे डॉ. संजय पाटील आणि टीम , तसेच पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार , पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, प्रदीप ठाकूर , दीपक शिंपी, रवींद्र ठाकूर , प्रशांत मिस्त्री , होमगार्ड खडसे आदींच्या पथकाने सहभाग घेतला . यावेळी बोलताना डॉ. संजय पाटील यांनी सांगितले कि , कोरोनाच्या पार्शवभूमीवर आज रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन तपासणी करण्यात येत असल्याचे सांगत त्यांना जागेवरच निगेटिव्ह प्रमाणपत्र देऊन पॉझिटिव्ह रुग्णांना कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली .







