जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील म्हसावद जवळ रेल्वे मार्गावर काल रात्री अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे.
हा मृतदेह सापडल्यानंतर त्या व्यक्तीला शेख शब्बीर रज्जाक यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात काल रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास दाखल केले . त्यानंतर सीएमओ डॉ संदीप पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा हा मृतदेह म्हसावद जवळच्या रेल्वे मार्गावरील खांब क्रमांक ४०३ / १६- १ जवळ आढळून आला पुढील तपास पो ना सुनील सोनार , पो कॉ किशोर बडगुजर करीत आहेत .