एरंडोल ( प्रतिंनिधी ) – तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्पात सध्याची पाणी पातळी 52 टक्के असून पाण्याची पातळी फक्त 4ते 5 फूट खाली आहे.
अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झालेला असल्याने धरणात 52 टक्के पाणीसाठा आज सायंकाळपर्यंत झालेला आहे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टीचा अंदाज असल्याने धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येईल.
अंजनी धरणाखालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून अंजनी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. कृपया जीवित वा वित्त हानी टाळण्याचे दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता, (गिरणा पाटबंधारे विभाग) यांचेतर्फे करण्यात येत आहे.