जिल्हा कार्यकारिणी निवडीसह कार्यकर्त्यांसह हितचिंतकांचा होणार सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव जिल्ह्याची बैठक व जिल्हा प्रेरणा मेळावा रविवार दि. ९ मार्च रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत जळगावात नूतन मराठा महाविद्यालयात डॉ. जगदीशचंद्र बोस सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह विविध शाखांच्या कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि मुख्य कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी केले आहे.
बैठकीमध्ये निरीक्षक म्हणून राज्याचे प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे उपस्थित राहतील. तर मार्गदर्शक म्हणून राज्याचे मानसिक आरोग्य प्रकल्प विभागाचे कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी, राज्याचे वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग कार्यवाह प्रा. डी.एस.कट्यारे, जिल्हाध्यक्ष नेमीवंत धांडे हे उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये नाशिक येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त मांडले जाणार आहे.
यासह अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या देणग्या संकलन, नविन २ वर्षाची जिल्हा कार्यकारिणी निवड तसेच शाखेच्या साप्ताहिक बैठक व कामांचा आढावा घेतला जाणार आहे. शाखा अहवाल सादर होणार आहे. तसेच, समितीला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. बैठकीला जिल्ह्यातील विविध शाखांच्या कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि मुख्य कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे, विश्वजीत चौधरी, प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी केले आहे.