मुंबई (वृत्तसंस्था ) – राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना जामीन मंजूर केला आहे. मनी लॉडरिंग प्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 11 महिने 2 दिवसांच्या कोठडीनंतर अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 2 नोव्हेंबर 2021 ला देशमुख यांना ईडीने अटक केली होती. आता आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.