• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेरच्या शासकीय इमारतीसाठी आ. अनिल पाटील यांचे धरणे आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2023
in Uncategorized
0
अमळनेरच्या शासकीय इमारतीसाठी आ. अनिल पाटील यांचे धरणे आंदोलन

????????????????????????????????????


जिल्हाधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन

जळगाव (प्रतिनिधी) – अमळनेर शहराच्या मध्यभागी शासकीय इमारत बांधण्यात यावी यासाठी आ. अनिल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन दि. १२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी, पंधरा दिवसाच्या आत त्याच ठिकाणी शासकीय इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. यानंतरच राष्ट्रवादीने आंदोलनाला स्थगिती देऊन यशस्वी सांगता केली.

शहरातील मध्यवर्ती भागात शासकीय इमारत बांधावी यासाठी आमदार अनिल पाटील यांच्यासह नागरिकांनी प्रयत्न सुरु केले. त्यात अडथळे निर्माण करून सदर इमारत गावाबाहेर ७ किमी वर नेण्याचा प्रयत्न केला जात होता. जर इमारत गावाबाहेर गेली तर वृद्ध इसम शालेय विद्यार्थी, महिला, दिव्यांग व्यक्ती त्या ठिकाणी पोहचू शकणार नव्हते. एक काम आटोपण्यासाठी येण्याजाण्याला लागणारा खर्च गरीब व्यक्ती करू शकत नाही आणि वेळेचा अपव्यय झाल्याने दुसरे काम होणे शक्य नव्हते. सदर गोष्ट आ. अनिल पाटील यांनी लक्षात घेत शासनाकडे पाठपुरावा सुरु केला.

बसस्थानकाच्या जवळच असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीच्या जागेवर महसूल इमारत व सर्व शासकीय कार्यालये एकत्र असलेली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व्हावी असा प्रस्ताव मांडला. त्यासाठी सतत तगादा लावून महसूल इमारत १४.१७ कोटी रुपयांची प्रशासकीय इमारत ११.५० कोटींची यांची प्रशासकीय मान्यता मिळवली. परंतु सदर इमारत बांधण्यासाठी अडथळे निर्माण झाले. त्यानंतर आ. अनिल पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने चार आठवड्यात प्रशासनाला निर्णय घ्यायला सांगितल्यावर जिल्हाधिकारी, पोलीस विभागाला आठ दिवसात जागेचा ताबा देण्याचे पत्र दिले. परंतु यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही.

म्हणून आमदार अनिल पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला. प्रशासकीय इमारतीच्या कामात अडथळा निर्माण करून सर्वसामान्य जनतेच्या सोयींवर टाच आणली जात होती. शासन आणि प्रशासन जनतेच्या हिताचा विचार करीत असताना अमळनेरात मात्र याउलट प्रकार होत असल्यानेच मी जनतेचा प्रतिनिधी आणि भूमिपुत्र नात्याने आंदोलनाचा पवित्रा उचलला आणि अमळनेरची जनता माझ्या पाठीशी उभी राहिल्याने प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला. प्रशासनाला देखील महसूल आणि प्रशासकीय इमारतीची किती गरज आहे याचे महत्व कळले आहे, असे मत आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केले.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शासकीय इमारत शहरातील मध्यवर्ती भागात येत्या पंधरा दिवसाच्या आत इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. यानंतर राष्ट्रवादी पक्षाने धरणे आंदोलनाची यशस्वी सांगता केली. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महिला आघाडीच्या मंगला पाटील, अशोक लाडवंजारी यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: https://kesariraj.com/anil-patil-dharne-aandolan-news-1/
Previous Post

चोरट्यांचा आता ग्रामीण भागात मोर्चा, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लांबविला

Next Post

बस-दुचाकी भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बस-दुचाकी भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

बस-दुचाकी भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1xbet russia

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

March 16, 2026
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती
1xbet russia

 जळगाव जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्साहात

March 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon