भुसावळ (प्रतिनिधी) – येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी प्रहार जनशक्ती राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
भाजपाचे तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून मानले जात होते. २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल चौधरी यांनी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. यातही ते पराभूत झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून अनिल चौधरी हे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा होती. आगामी नगरपालिका निवडणुकीत ते भुसावळात शिवसेनेचे नेतृत्व करतील अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र आज त्यांनी शेतकरी नेते राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. आणि अनिल चौधरी यांनी प्रहार जनशक्ती या पक्षात प्रवेश केला आहे.