चोपडा तालुक्यातील धानोरे शिवारातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील गलंगी येथून जवळच असलेल्या तोंडे येथील शेतकरी धानोरे शिवारात जात असताना अनेर नदीच्या पाण्यात त्यांची बैलजोडी वाहून गेली. या दुर्दैवी घटनेत बैलजोडी पाण्यात बुडाल्याने बैलाचा मृत्यू झाला. तर सुर्दैवाने गाडीवान मात्र बचावले.
येथून जवळच असलेल्या शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील निंबादास प्रल्हाद चौधरी यांचे नदी पालिकडील चोपडा तालुक्यातील धानोरे प्र. शिवारात शेत आहे.(केसीएन)सकाळी ८ वाजता निंबादास चौधरी हे अनेर नदी ओलांडून बैलगाडीसह धानोऱ्याकडे येत होते. पाण्याच्या प्रवाहात त्यांची बैलजोडी वाहून गेल्याने त्यांचे दोन्ही बैल ठार झाले. सुर्दैवाने गाडीवान मात्र बचावला. सध्या अनेर धरण पाण्याने पूर्ण भरले असून अनेक वेळा अतिरिक्त पाणी अनेर नदीत सोडण्यात येते. त्यानुसार या घटनेत पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, तोंदे गावाजवळ पाणी खोल असल्याने बैल त्यात बुडाले आहेत. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेत निंबादास चौधरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. चौधरी यांनी अलीकडेच ७० हजार रुपयांना ही नवीन बैलजोडी खरेदी केली होती. या घटनेने गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.