जळगाव ;- शहर महानगरपालिका मार्केट गाळेधारक संघटनेतर्फे पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषण चा आज चौथा दिवस होता. उपोषण स्थळी सकाळी ९ ते १ थाळीनाद आंदोलनात भोईटे मार्केटचे सुजित किनगे, अविनाश भोळे, रमेश सुर्यवंशी, हर्षा बोरोले, सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते तसेच दुपारी १ ते ५ नितीन जगताप, विलास महाजन, प्रवीण पाटील, लक्ष्मीकांत कलाल, भरत कोल्हे उपस्थित होते.
गाळेधारकांच्या साखळी उपोषणाला विविध संघटना संस्थांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, भाजपाचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ, विलास सांगोरे, आशिष सपकाळे, पंकज मोमाया, सुरेश पाटील उपस्थित होते. उद्या बी.जे. मार्केटचे गाळेधारक बेमुदत साखळी उपोषण स्थळी घंटानाद करणार आहेत.








