धरणगाव ( प्रतिनिधी ) ;- आज धरणगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्यतेल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.
धरणगाव शहरातील सर्व पेट्रोल पंपावरहे आंदोलन करण्यात आले
या प्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव डी. जी.पाटील यांनी पेट्रोल व डिझेल दरवाढ केल्याबद्दल केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करत लवकरात लवकर दरवाढ कमी न केल्यास आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाईल असे जाहीर केले,. याप्रसंगी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रामनाथ चिंधु पाटील,मंगल भिका पाटील, तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र न्हायदे, डॉक्टर व्ही डी पाटील दुर्वसिंह बिसेन,महेश पवार, दीपक जाधव,बापू जाधव वाल्मीक पाटील नंदकुमार पाटील,गोपाल पाटील, रामचंद महाजन ऋषिकेश जाधव, मनोज कंकरे, आर एन पाटील, युवक चे प्रमोद जगताप, गौरव सिंग चव्हाण,राहुल मराठे, भूषण भागवत, योगेश येवले, दीपक मराठे, शिवा महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते.