कॉग्रेसतर्फे प्रांताधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा भडगावमध्ये निर्बंध काळात व्यापारी वर्गाच्या वेळेत बदल करून मागिल काळातील जळगाव पॅटर्न लावावा वेळ ११ते ५ करुन नाभिक समाजाला देखील परवानगी द्यावी अशी मागणी कॉग्रेसने आज प्रांताधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले असून सध्या शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. सध्या व्यवसाय करण्यासाठी सकाळी ७ ते दुपारी २ ची देण्यात आली आहे. त्यामुळे ही वेळ मागिल काळात ज्या प्रकारे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती तोच जळगाव पॅटर्न राबविण्यात यावा . यामुळे व्यापारी पेठेत गर्दी कमी होईल आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाला मदत होईल अशी मागणी कॉग्रेसने केली. तसेच नाभिक समाजावर अन्याय होत असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कोरोना नियमावली देउन नाभिक समाजाला दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी शहर अध्यक्ष अँड. अमजद पठाण,जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस मनियार,शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी, तालुका युवक अध्यक्ष संदीप पाटील, महिला आघाडीच्या अॅड मनिषा पवार, कुसुम पाटील, शिला सुर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,एन एस यु आय चे साई पाटील आदी उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पाठविण्यात आल्या आहे.