पटकाविला प्रथम क्रमांक, जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या खेळाडूंना यश
जळगाव (प्रतिनिधी) :- अमरावती येथे झालेल्या ३ री खुली युथ फायटर तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी १५ सुवर्ण, १५ रौप्य, १९ कांस्यपदके पटकावून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले, या स्पर्धा युथ स्पोर्टस् फाउंडेशन, अमरावतीच्या वतिने जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या होत्या, या स्पर्धेचे उद्घाटन अमरावती चे माजी खासदार नवनित राणा, आमदार रवी राणा, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेत जळगांव, अहिल्या नगर, अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला,
स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :-१) दर्शन कानवडे, २) श्रेयांग खेकारे,३) पुष्पक महाजन,४) क्षितीज बोरसे,५) प्रणव भोई, ६) कोमल गाढे, ७) निकिता पवार, सर्व ( जैन स्पोर्टस् अकॅडमी, जळगांव )
(१) पुष्कर पिसे, (२) भुमिका सोनवणे,(३) वेदिका पाटील (४) भूमी कांबळे (सर्व पॅन्थर तायक्वांडो अकॅडमी, बोदवड)
१) संकल्प गाढे २) अमर शिवलकर ३) त्रिशा झिरमाळी ४) गना टी मनू सर्व रावेर
रौप्य पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :- १) मयुर पाटील, २) देवयानी पाटील,३) निकिता पवार, (४) मयुर पाटील (सर्व जैन स्पोर्टस् अकॅडमी जळगांव)
१) पार्थ माळी, २) साहिल खराते ३) आम्रपाली खराते ४) आरोही पवार (सर्व पॅन्थर तायक्वांडो अकॅडमी, बोदवड)
१) युग महाजन, २) मयांक खराळे ३) सम्राट गुमळकर ४) दिनेश चौधरी ५) कश्मिरा तडवी ६) हंसिका बारी ७) नंदिनी रूळे सर्व रावेर
कांस्यपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :- १) दानिश तडवी, २) सिद्धी पाटील ३) गुरु कारंडे ४) मानसी कारंडे ५) आरोही गवळे (सर्व जैन स्पोर्टस् अकॅडमी)
१) कोमल ढाके, २) सानवी सुरडकर ३) दीक्षा कांबळे ४) तेजल ढाके ५) मधुरा राणे ६) आचल इग्ंलस ७) ब्लेसी पांडे ८) प्रशंसा मोरे
सर्व पॅन्थर तायक्वांडो अकॅडमी, बोदवड,
१) सुर्याश चावरे २) आशिष फुलमाळी ३) शुभम शिवलकर ४) समर्थ तायडे ५) रोशन गाढे ६) प्रनव गाढे रावेर
सदर विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक जयेश कासार, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन, दानिश तडवी, गिरीश खोडके याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले तर पंच म्हणून जयेश बाविस्कर, स्मिता बाविस्कर, निकेतन खोडके, जिवन महाजन यांनी प्रमुख काम पाहिले. खेळाडूंच्या यशाबद्दल जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.