अमळनेर ;- अमळनेरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊनमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. जळगाव यांचे आदेशा नुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिल्लक असलेला धान्य साठा विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यानुसार जि.प.प्राथमिक शाळा, मुंगसे ता.अमळनेर येथे शाळेतील शिल्लक असलेला शालेय पोषण आहारातील तांदूळ व इतर धान्यसाठा (मूग, चवळी, मठ, मुगडाळ, तूरडाळ, मसुरदाळ) सर्व मुलामुलींना समप्रमाणात वाटप करण्यात आला.
यावेळी मुंगसे गावाचे ग्रामविस्तार अधिकारी संजय पाटील यांच्या कडून शाळेतील, अंगणवाडीतील आणि गावातील इतर सर्व मुलामुलींना वेगवेगळ्या चवीचे बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक जगदिश चौधरी व शिक्षक अशोक इसे यांच्या कडून सर्व मुलामुलींना वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स व कुरकुरे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कोरोनाचा भयावह प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टन्स्’ ठेवून व योग्य ती काळजी घेतली जात होती. वाटप झाल्यानंतर दापोरी व मुंगसे येथिल मुलामुलींना व पालकांना खूपच आनंद झाल्याचे दिसून आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.