अमळनेर तालुका प्रतिनिधी कमलेश वानखेडे
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, पारोळा व चोपडा तालुक्यातील होमगार्डचे तिमाही संमेलन अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात होमगार्डच्या विविध समस्या, अडचणी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख म्हणून होमगार्ड विभागाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, प्रशासकीय अधिकारी रामनाथ काळे उपस्थित होते. तसेच जिल्हा केंद्र नायक गंगाधर महाजन, जिल्हा पलटण नायक मदन रावते, वरीष्ठ लिपिक पंकज नेरकर, कानिष्ठ लिपिक रितेश पाटील,शिपाई हेमंत माळी,अमळनेर प्रभारी समादेशक अधिकारी गोपाल वना पाटील, पारोळा प्रभारी समादेशक अधिकारी अरुण पाटील, चोपड्याचे साजिद सैय्यद शेख, संजीव सोनवणे, धरणगावचे प्रभारी समादेशक अधिकारी ईश्वर महाजन व पलटण नायक ईश्वर पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
होमगार्ड ही एक मानसेवी संघटना असून पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या मागणीनुसार होमगार्डना विविध कर्तव्यांवर तैनात करण्यात येते. होमगार्डच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी, समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत मा. महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार या तिमाही संमेलनाचे चारही तालुके मिळून आयोजन करण्यात आले होते.
संमेलनात अमळनेर ,पारोळा, चोपडा ,धरणगाव येथील सर्व होमगार्ड पथकातील होमगार्ड बांधव उपस्थित होते यावेळी तिमाही संमेलनात ३६५ दिवस कायमस्वरूपी काम मिळावे, तीन वर्षांची पुनर्नियुक्ती पद्धत बंद करावी, विमा सुविधा, टी.ए., डी.ए. मिळावे, तसेच तालुका समादेशकांची किमान पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्या मांडल्या. यासह विशेष कामगिरी केलेल्या होमगार्डचे कौतुक करण्यात आले.
यावेळी जिल्हा समादेशक अशोक नखाते यांनी उपस्थित होमगार्डच्या सर्व समस्या व तक्रारींची सविस्तर नोंद घेऊन त्या होमगार्ड महासमादेशक, मुंबई यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
संमेलनासाठी अमळनेर येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी तालुका समादेशक गोपाल वना पाटील सोबत कैलास पाटील , भीमराव संदानशिव, विष्णू पाटील यांनी मोलाचे सहकार्य दिले.









