अमळनेर तालुक्यातील वासरे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वासरे येथे काहीही कारण नसतांना दारूच्या नशेत येवून महिलेसह तिच्या जेठाणी आणि सासरे यांना शिवीगाळ करून सासऱ्यांना लाकडी काठीने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मारवड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वासरे गावात निकिता निलेश पाटील (वय २१) या महिला कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता काहीही कारण नसतांना निकिता पाटील यांच्यासह त्यांची जेठाणी श्र्वेता पाटील व सासरे शंकर रघुनाथ पाटील यांना गावात राहणारे विलास माधव पाटील, संदीप विलास पाटील आणि मिनाबाई विलास पाटील सर्व रा. वासरे ता.अमळनेर यांनी शिवीगाळ केली. तर महिलेचे सासरे शंकर पाटील यांना लाकडी काठीने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निकिता पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विलास माधव पाटील, संदीप विलास पाटील आणि मिनाबाई विलास पाटील (सर्व रा. वासरे ता.अमळनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.