अमळनेर तालुक्यातील लवण नाल्याजवळ घडली घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यात गत २ दिवसांपासून लवण नाल्याला पूर आलेला असून पारधी वाडा, भिल्ल वस्ती व सप्तशृंगी देवी मंदिर परिसरात पुराने वेढा घातला होता. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक शेतकरी तेथून जात असताना त्याचा पाय घसरून पडल्याने तो वाहून गेला आहे. याप्रकरणी बचाव पथकासह पोलीस स्टेशनचे कर्मचारी मदत कार्य करीत आहेत.
शेतकरी सर्जेराव संतोष बिरारी (वय ५०) हे शेतात जात असताना पाय घसरून पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, सर्जेराव पाटील हे घरातील कर्ते पुरुष होते. घरातील कर्ता पुरुष वाहून गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महसूल विभाग व ग्रामस्थांकडून त्यांचा शोध सुरू होता. परंतु, संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नसल्याने गावकऱ्यांचं कुटुंबाची चिंता वाढली आहे.