१२ अपक्ष विजयी, शहर विकास आघाडीचे वर्चस्व
अमळनेर ( प्रतिनिधी ) – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अमळनेर नगरपरिषदेचा रणसंग्राम अखेर शांत झाला असून, मतदारांनी आपला स्पष्ट कौल दिला आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांनी ३०,८५६ मते मिळवत ८,६४८ मतांच्या मोठ्या फरकाने दिमाखदार विजय संपादन केला आहे. एकूण ३६ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र, अपक्ष आणि शहर विकास आघाडीने मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
या निवडणुकीत शहर विकास आघाडीने ११ जागा जिंकून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे, तर आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील गटाला (धनुष्यबाण + पुरस्कृत) एकूण १२ जागा मिळाल्या आहेत. मात्र, सर्वाधिक १२ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आल्याने पालिकेची सत्ता स्थापन करताना या अपक्ष नगरसेवकांची भूमिका कळीची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या विजयामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून, आता नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्ष शहराच्या विकासाला कशी गती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमळनेर नगरपरिषद निकाल २०२५
१ अ – कविता विजय राजपूत
(शहर विकास आघाडी) १३५० मते १ ब – कैलास नामदेव पाटील (अपक्ष) – १३४६ मते
प्रभाग क्र. २ अ – कांबळे देवेंद्र भानुदास (शहर विकास आघाडी) – १४८८ मते, २ ब – अफसाना मुक्तार खाटीक
(शहर विकास आघाडी) – १६२३ मते
प्रभाग क्र. ३ अ – शोभाबाई भिवसन गढरे (शहर विकास आघाडी) – १४१३ मते ३ ब – भरतकुमार सुरेश ललवाणी
(शहर विकास आघाडी) – १२८० मते
प्रभाग क्र. ४ अ – नंदा नरेंद्र संदानशिव (शहर विकास आघाडी) – १९०० मते ४ ब – शेख नाविद अहमद मुशिरोद्दीन
(शिवसेना) – १४९१ मते* प्रभाग क्र. ५ अ – श्रीराम भगवान चौधरी
(शिवसेना) – १४५४ मते, ५ ब – कल्पना भरतसिंग परदेशी (सफरचंद) १३९२ मते
प्रभाग क्र. ६ अ – सविता योगराज संदानशिव (कपबशी) २०७४ मते ६ ब – दीपक हरी चौगुले (कपबशी) – १९२६ मते
*प्रभाग क्र. ७ अ – प्रा. योगिता सयाजीराव (बबलू दादा) कापडणेकर (अपक्ष) – १२४१ मते, ७ ब – प्रवीण गंगाराम पाटील (राजू फाफोरेकर) १३३२ मते
प्रभाग क्र. ८ अ – सचिन बळवंत पाटील (बिनविरोध), ८ ब – अपूर्वा जालंधर चौधरी (पाटील) १४५३ मते, प्रभाग क्र. ९ अ – शर्मा कल्पना चंद्रकांत १३३१ मते, ९ ब – चौधरी पंकज पंडित १५३७ मते
प्रभाग क्र. १० अ – संजय विभाकर कासार (गोपी कासार,अपक्ष) – विजयी, १० ब – स्वाती परदेशी (अपक्ष) ११८२ मते
प्रभाग क्र. ११ अ – छाया बाळू पाटील १६३७ मते, ११ ब – विजय कहारू पाटील
(अपक्ष) २१७६ मते
प्रभाग क्र. १२ अ – पुष्पा पंकज भोई १५८६ मते, १२ ब – धनगर सुयोग ज्ञानेश्वर
(शिंदे सेना) : १६१८ मते
प्रभाग क्र. १३ अ – जुबेदाबी नशिरोद्दिन काझी १८९८ मते, १३ ब – अनिल गंगाराम महाजन (अबू महाजन) १६६६ मते
प्रभाग क्र. १४ अ – सुवर्णा तुळशीराम हाटकर
(अपक्ष) १२८५ मते, १४ ब – रामकृष्ण बाबुराव पाटील,अपक्ष ९२३ मते
प्रभाग क्र. १५ अ – प्रशांत मनोहर निकम११४० मते, १५ ब पाटील जयश्री अनिल विजयी
*प्रभाग क्र. १६ अ – देशमुख महेश प्रभाकर (महेश बापू) (अपक्ष) – विजयी, १६ ब नीलिमा विश्वनाथ (रवी पाटील)
(अपक्ष) विजयी
*प्रभाग क्र. १७ अ – पाटील स्वप्ना विक्रांत (शिटी) –विजयी १७ ब – पवार साहेबराव वसंत (दादा पवार) विजयी
प्रभाग क्र. १८ अ – रूपाली विलास शिवदे (अपक्ष) १९६५ मते, १८ ब – इर्शाद सुनिल तडवी १३५७ मते
पक्षीय बलाबल
एकूण जागा : ३६
शहर विकास आघाडी – ११
शिरीष चौधरी (धनुष्यबाण) – १०
शिरीष चौधरी पुरस्कृत उमेदवार – ०२
राष्ट्रवादी (शरद पवार गट – तुतारी) – ०१
अपक्ष – १२









