अमळनेर तालुक्यातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : बियाणे कंपनीत नोकरीला असलेल्या एका युवकाने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ रोजी सकाळी साडे १० वाजता शहरातील कलागुरू ड्रीम सिटीत घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
देवेंद्र साहेबराव पाटील (वय २७ रा. जवखेडी पाथरी ता. जि. जळगाव, हल्ली मु. कलागुरू ड्रीम सिटी, अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. देवेंद्र हा हैदराबादच्या असलेल्या एका बियाणे कंपनीत अमळनेर शहरात नोकरीला होता. त्याने रात्रीपासून दरवाजा उघडलेला नाही असा फोन विक्रांत शिंदे याने प्रशांत अशोक पाटील याला कळवले. देवेंद्र जेथे राहत होता तेथे दरवाजा उघडला असता तो छताला फासावर लटकलेला दिसला. त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशांत पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील तपास करीत आहेत.