आ. अनिल पाटील यांनी वर्चस्व राखले
अमळनेर (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर भाजपला ४ व अपक्ष ३ उमेदवार जागांवर विजयी झाले. अपक्ष उमेदवाराने देखील महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले आहे.
पुरुष व महिला राखीव सोसायटी मतदार संघातून अशोक पाटील, सुभाष पाटील, सुरेश पाटील, अशोक पाटील, भोजमल पाटील, स्मिता वाघ, अपक्ष नितीन पाटील, सुषमा देसले, पुष्पा पाटील, सेवा सहकारी विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून समाधान धनगर, इतर मागासवर्गीय मतदार संघात डॉ. अनिल शिंदे, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघात हिरालाल पाटील, अनुसूचित जाती जमाती मतदार संघात भाईदास भिल, हमाल मापाडी मतदार संघात शरद पाटील, व्यापारी मतदार संघात अपक्ष वृषभ पारेख, प्रकाश अमृतकर असे दोघेही बिनविरोध निवडून आले.