अमळनेर (प्रतींनिधी)- येथील समर्थ नगरमधील पदमावती अपार्टमेंटमधील दीपली गुणवंत पवार या
महिलेने 25 रोजी जितपिर येथे दुचाकी उभी करून तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना
घडली.
25 रोजी सायकली साडेपाच वाजेच्या सुमारास दीपाली पवार ही महिला एम.एच. 19. बी.एच. 6769
या क्रमाकाची दुचाकी घेवून आली. आणि तलावाच्या काठी उभी करून सरळ तलावात उडी घेतली.
योगेश धनराज बागूल यांनी ही घटना पहिली व पोलिस पाटील गोविंदा लोटन पाटील यांना कळवली.
त्यांनी संतोष कोळी व महेंद्र पाटील यांच्या मदतीने महिलेला बाहेर काढले. मारवड पोलिसात खबर
दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोद करण्यात आली आहे. तपास हेकों. भास्कर चव्हाण हे करीत आहे.







