अमळनेर तालुक्यात चोपडा रस्त्यावर घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून चोपडा रोडवरील एका परिसरात तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता समोर आला आहे. या संदर्भात बुधवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता अंमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अमळनेर शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी अन्नू नारायण साळुंखे (पारधी) (रा. अमळनेर) याने पीडित मुलीला फोन करून भेटण्यास बोलविले. त्यानंतर त्याने तिला दुचाकीवर बसवून चोपडा रोडवरील एका मंदिराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. या घटनेसाठी संशयित आरोपीला गण्या उर्फ गणेश नाना साळुंखे (पारधी) याने सहकार्य केले. दरम्यान हा प्रकार घरी आल्यानंतर पिढीने नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार नातेवाईकांसह तिने अमळनेर पोलिसात धाव घेऊन दोघांविरोधात फिर्याद दिली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून बुधवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता संशयित आरोपी अन्नू नारायण साळुंखे (पारधी) आणि गण्या उर्फ नाना साळुंखे (पारधी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहे.