अमळनेर(प्रतिनिधी ) ;- ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपतर्फे उद्या २६ रोजी सकाळी १०. ३० वा. बळीराजा स्मारक येथे चक्काजाम आदोंलन करण्यात येणार आहे. भाजप आणि ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मा.सभापती श्याम आहिरे यांनी केले आहे.