अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील ताराचंद नगर येथील बंद घरातून अज्ञात चोरटयांनी घर फोडून घरातील रोकड आणि दागिन्यांसह सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , कमलेश सोनवणे (वय-२५) रा. गलवाडे रोड, ताराचंद नगर, अमळनेर हे आपल्या कुटुंबियांसह २५ मे रोजी गावाला गेले. दरम्यान २६ मे रोजीच्या मध्यरात्री १ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून घरातील लाकडी कपाटातील २ लाख रूपयांची रोकड आणि ३६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि राकेशसिंग परदेशी करीत आहे.