अमळनेर(प्रतिनिधी ) एचएससी बोर्ड नाशिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला. धनदाई माता एज्युकेशन सोसायटी (प्र.डांगरी) ता. जि.धुळे संचलित जय योगेश्वर माध्य.व उच्च विद्यालय अमळनेर या उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला व विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल १००% टक्के निकाल लागला असून विज्ञान शाखेतून प्रथम कोमल संजय भामरे (९४.१६%)द्वितीय विजय जितेंद्र पाटील (९४.१६%)तृतीय मंथन किशोर पाटील (९४.००%) यांनी यश संपादन केले. तर कला शाखेत प्रथम नंदिनी सुनील मोरे( ८७.६६% )द्वितीय ऋषिकेश रामकृष्ण चव्हाण (८७.५० )तृतीय चेतन सुरेश जाधव (८७.१६%) गुण मिळवून यश संपादन केले असून या वर्षी मुलींनी बाजी मारली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन नानासो.प्रा.डी .डी. पाटील व प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.