अमळनेर ;- येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत १ लाख ५२ हजार रुपयांचे योगदान दिले आहे.
त्यापैकी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ हजारांचा धनादेश तहसीलदार मिलिंद वाघ यांना सुपूर्द केला.
पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २१ हजारांचा धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे सुपूर्द केला.
तर शहरात भानुबेन गोशाळेच्या माध्यमातून गोरगरिबांना सुरू असलेल्या अन्नदानाचा एक दिवसांचा खर्च १ लाख १० हजार रुपये गोशाळेचे सचिव चेतन शाह ,प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, राजू सेठ यांना सुपूर्द केला.
यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,उपाध्यक्ष एस. एन.पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम उपस्थित होते.
याशिवाय मोठ्या संख्येने सॅनिटायझर्स व मास्कचेही मोफत वितरण संस्थेने केले आहे.