नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – ऑनलाइन गांजा पुरवल्याबद्दल अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा अंदाज आहे की साधारण एक लाख ४८ हजार कोटी डॉलर्स किमतीचा एक हजार किलो गांजा आत्तापर्यंत अॅमेझॉनच्या माध्यमातून विकला गेला आहे.
मध्यप्रदेश पोलिसांनी १४ नोव्हेंबररोजी दोघांना २० किलो गांजासह ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी लक्षात आलं की हे लोक अॅमेझॉन वेबसाईटचा वापर गांजा खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी करत होते.
अॅमेझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी केली कंपनीची कागदपत्रं आणि दिलेली उत्तरं यात तफावत आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या आधीही या संचालकांशी गांजा तस्करीविषयी चौकशी केली होती. मात्र अॅमेझॉनने आपल्यावरील आरोप फेटाळले आहे.