खेडीढोक गावात आमदारांचे जंगी स्वागत
पारोळा : तालुक्यातील खेडीढोक गावात आमदार अनिल पाटील यांचे गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले. व माजी आमदार वनश्री, कृषिभूषण, साहेबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्ष दिंडी देखील काढण्यात आली होती. यावेळी माजी पालकमंत्री सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील या त्रिमूर्तींना ऐकण्यासाठी खेडीढोक गावासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. कोरोना बाबत सर्व नियम पाळत कार्यक्रम संपन्न झाला.
प्रास्ताविकेच्या माध्यमातून गावाच्या समस्यांचा पाढा माजी उपसरपंच बालू पाटील यांनी वाचला. यावर आपल्या संबोधनात आमदार अनिल पाटील यांनी तुमच्या गावाच्या समस्या मी सोडेलच. येत्या काही महिन्यानंतर आपण कामांना सुरुवात करू असे आश्वासन आमदार पाटील यांनी गावकऱ्यांनी दिले. गावाचा पाणी तसेच पूर्ण वेळ विजेच्या विषयावरही पाटील यांनी शेळावे सब स्टेशन बाबत माहिती दिली व हे स्टेशन झाल्यावर नक्किच गावाच्या विजेचा प्रश्न सूटेल असे त्यांनी सांगितले. खेडीढोक व चिखलोड या गावांना जोडणारा रस्ता आज पर्यंत झाला नसल्याने आधी तोच रस्ता आपण मार्गी लावू असे त्यांनी म्हटले. जेणे करून चिखलोड व इतर ठिकाणी जाणाऱ्या लोकांना अडचणी येणार नाहीत. तसेच निवडणुकीच्या काळात माझ्या कडे एक रुपया नसतांना या गावांनी मला काहीही अपेक्षा न करता निवडून दिले. सध्याच्या काळात कोणी सरपंच पद सोडत नाही. मात्र माजी आमदार साहेबराव पाटील यांनी माझ्यासाठी स्वतःच्या आमदारकीचा बळी दिला व मला आमदार बनवले. मला राष्ट्रवादी पक्षात घेऊन जाणारे साहेबराव पाटील हेच आहेत. व आज मला राष्ट्रवादी पक्षात असल्याचा अभिमान वाटतो. मला भारतीय जनता पक्षाने स्टेज वर जागाही दिली नव्हती. त्यांचे अनेक ओझे मी उचलले मात्र त्यांना किंमत नव्हती असा निशाणा त्यांनी भाजपा वर साधला.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणेच धुवाधार बॅटिंग केली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे असे त्यांनी म्हटले. खेडीढोक ते राजवड रस्त्यासाठी गेल्या अधिवेशनात एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. व ते काम टेंटर झाल्यावर लवकरच सुरू होईल अशी माहिती देखील मा. आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी दिली. तसेच गावाच्या विकासासाठी देणगी म्हणून साहेबराव पाटील यांनी एक्कावन हजार रुपये देणगी म्हणून दिले. त्या पैशांनी आता खेडीढोक येथील विठ्ठल मंदिरात स्टाईल बसवली जाणार आहे.
माजी पालकमंत्री सतीश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, आम्ही शासनाकडे या गावाच्या विकासाठी नेहमी प्रयत्न करू. यावेळी खेडीढोक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.